
Krishnaraj Mahadik Maharashtra tour
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले आणि तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूर येथून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा येथील विविध सामाजिक, राजकीय व डिजिटल क्षेत्रांतील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
दौऱ्याची सुरुवात त्यांनी नागपूर येथील भाजप कार्यालयाला भेट देऊन केली. तिथे त्यांनी युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, राज्यातील तरुणांना संधी कशा मिळाव्यात आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक उपयोग कसा करावा, यावर सखोल चर्चा केली.
यानंतर त्यांनी नागपूरच्या जापनिज गार्डनमध्ये आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सची भेट घेतली, जिथे सुमारे ३५० पेक्षा अधिक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कृष्णराज महाडिक यांनी या सर्वांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली.
नागपूरचे आमदार परिणय फुके यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली, आणि फुके कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी तरुणांसाठी रोजगार निर्मिती, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि क्रीडा विकास यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यानंतर वर्धा येथे राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांच्या पुढाकाराने आयोजित ‘विदर्भ क्रिएटर्स कॉन्क्लेव्ह’मध्ये कृष्णराज महाडिक हे मुख्य पाहुणे म्हणून सहभागी झाले. या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराबाबत मार्गदर्शन करत विदर्भातील सोशल मीडिया क्रिएटर्सना नवी दिशा दिली.
कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की,
“सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे नव्हे, तर सामाजिक एकी, विकास आणि सकारात्मक विचार प्रसाराचे प्रभावी माध्यम आहे.”
त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. देशभरातील नामवंत कब्बडीपटूंनी यात भाग घेतला.
या प्रसंगी कृष्णराज महाडिक यांचा सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रात योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी ‘खेलो इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा उल्लेख करत, खेळाचे महत्त्व, शिस्त, आत्मविश्वास, संघभावना याबाबत प्रभावी भाष्य केले.
आपल्या महाराष्ट्र दौर्याच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल कृष्णराज महाडिक यांनी आपल्या फॉलोअर्स, भाजप पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
Prominent youth icon and digital influencer Krishnaraj Mahadik has officially kicked off his Maharashtra tour from Nagpur, where he participated in a series of impactful social, political, and digital events in Nagpur and Wardha.
The tour began with a visit to the BJP office in Nagpur, where he interacted with youth wing leaders. The discussion focused on creating opportunities for the youth in Maharashtra and promoting the positive use of digital platforms for social and political progress.
Following that, Krishnaraj Mahadik met with over 300 enthusiastic followers at the Japanese Garden in Nagpur. He shared a candid and inspiring conversation with them, surprising many by engaging personally and encouraging their digital aspirations.
Later, he visited MLA Parinay Fuke’s residence and interacted with the Fuke family. During the meeting, Mahadik emphasized key youth issues such as employment generation, startup support, and the development of sports infrastructure.
In Wardha, he was invited as a special guest at the Vidarbha Creators Conclave, hosted by State Minister Pankaj Bhoyar. Addressing hundreds of digital creators, Mahadik spoke about the power of social media as a tool for positive change. He encouraged young creators from across Vidarbha to use social media responsibly and meaningfully.
“Social media is not just for entertainment. It’s a powerful medium for social unity, development, and spreading positive ideas,” he said.
He concluded his visit by attending the National Kabaddi Championship in Nagpur as an invited guest. The event, organized with the support of Minister Pankaj Bhoyar, featured renowned kabaddi players from across the country.
Mahadik was honored at the event for his contributions to both social initiatives and sports promotion. In his address, he highlighted the importance of sports in building discipline, confidence, team spirit, and good health, while also praising PM Narendra Modi’s Khelo India initiative.
As he continues his Maharashtra tour, Krishnaraj Mahadik expressed gratitude for the overwhelming response from followers, youth volunteers, and BJP leaders, stating that it fuels his motivation to engage even more with young people across the state.
Read this : https://kolhapurdistrict.in/category/politics/
https://newsaakhada.com/wp-content/uploads/2025/05/IMG_20250512_175312.jpg